शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. पण सध्या त्याबद्दल थोडा उशीर होत आहे.
हा हप्ता पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा हप्ता आल्यावरच दिला जातो. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जमा होण्यात उशीर झाला, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचाही हप्ता पुढे ढकलला गेला आहे. पीएम किसानचा हप्ता पूर्ण जमा झाल्यावरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याबाबत निर्णय होईल.
सध्या पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी कोणताही नवीन निधी मंजूर झालेला नाही. तसेच पुढचा हप्ता देण्यासाठी लागणारा सरकारी आदेश (GR) देखील काढलेला नाही. त्यामुळे पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतरही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास अजून वेळ लागू शकतो.
या निधीच्या अभावामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे की, या योजनेसाठी ठेवलेले ५,००० कोटी रुपये कृषी समृद्धी योजनेत वळवले जातील का. त्यामुळे पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दल सरकारकडून अजून काहीही अधिकृत माहिती आलेली नाही. माहिती मिळाल्यावर ती लगेच कळवली जाईल.