लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जून-जुलैचा हप्ता एकत्र जमा – बँक खात्यात थेट ₹3000!

लाडकी बहीण योजना घेणाऱ्या बहिणींना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जून महिना संपत आला आहे, पण अजूनही बऱ्याच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक बहिणींना चिंता वाटू लागली आहे की पैसे कधी येणार? आता चर्चा अशी सुरू झाली आहे की जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र म्हणजेच 3000 रुपये मिळणार आहेत.

मात्र, सरकारकडून अजूनही यासंदर्भात कोणतीही स्पष्ट किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याआधीही एक-दोन वेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात आले होते, त्यामुळे या वेळीही तसंच होईल का, असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे.

जून महिना संपायला फक्त काही दिवसच उरले आहेत, तरीही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अजूनपर्यंत जून महिन्याच्या हप्त्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. हप्ता कधी जमा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

मे महिन्याचा हप्ता देखील थोडा उशिरा म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाला होता. त्यामुळे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की जूनचा हप्ता देखील जुलैमध्ये मिळू शकतो. जर तसं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत. जून महिना हा 12वा हप्ता असणार आहे. सरकारकडून प्रत्येक महिन्याची ठराविक तारीख जाहीर केली जात नाही, त्यामुळे हप्ता कधी येणार याची अचूक माहिती मिळत नाही. पण आताच्या बातम्यांवरून असं वाटतंय की 12वा हप्ता म्हणजेच जूनचा हप्ता येत्या काही दिवसांत जमा होऊ शकतो.

सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या यादीत आपलं नाव आहे का ते तपासायला हवं. कारण फक्त यादीत नाव असलेल्या महिलांनाच हा हप्ता मिळतो. जर नाव असेल तर शक्यता आहे की जुलैमध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळू शकतात.

Leave a Comment