लाडकी बहिण खुश! जूनचा ₹1500 हप्ता खात्यात जमा, लगेच चेक करा खाते!

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे दिले जातात. जून महिन्याचे पैसे ३० जून रोजी जमा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रत्येक पात्र महिलेला ₹1500 हे पैसे मिळणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनेक बहिणींना प्रश्न पडला होता की, “जून संपत आलाय पण अजून पैसे आले नाहीत का?” पण आता चिंता करण्याचं कारण नाही. अजित पवार यांनी सांगितलं की सरकारने 3600 कोटी रुपये बँक खात्यांमध्ये पाठवले आहेत. हे पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने दिले जातील.

हे पैसे फक्त त्याच महिलांना मिळतील ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे आणि ज्यांची पात्रता सरकारने मंजूर केली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुमचं बँक खाते एकदा तपासा. तुमच्याही खात्यात पैसे आले असतील.

सरकारनं महिलांसाठी हा एक चांगला निर्णय घेतला आहे. अजित पवार म्हणाले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे महिलांच्या मदतीसाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे.

जर तुम्हीही या योजनेची लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. ३० जूनपासून पैसे जमा होणं सुरू झालं आहे. म्हणून लगेच तुमचं बँक खाते तपासा – ₹1500 जमा झालेत का बघा!

Leave a Comment