महाराष्ट्रात चालू असलेल्या “माझी लाडकी बहीण” योजनेतून अनेक महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते. या योजनेतून आतापर्यंत एकूण ११ वेळा महिलांच्या खात्यात पैसे पाठवले गेले आहेत. आता सर्व महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. ही प्रतिक्षा आता संपली आहे, कारण सरकारकडून माहिती देण्यात आली आहे की आजपासून महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
हा जो जून महिन्याचा हप्ता आहे, तो १२ वा हप्ता आहे. म्हणजेच, या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. जर तुम्ही या योजनेत नाव नोंदवले असेल आणि पात्र असाल, तर तुमच्या खात्यात सुद्धा हप्ता जमा झाला असेल. त्यामुळे लगेच तुमचं बँक खातं तपासा.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे की, राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये आजपासून पैसे पाठवले जात आहेत.
तुम्ही जर याआधीच्या हप्ते मिळवले असतील आणि पात्र असाल, तर हप्ता जमा झाला की नाही हे तुम्ही खातं तपासून लगेच बघू शकता. कारण पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच सर्वांना पैसे मिळणार आहेत.