तुमचं नाव यादीत असेल तर मिळाले ₹1500! लाडकी बहीण योजना यादी लगेच पाहा

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या “माझी लाडकी बहीण” या योजनेतून महिलांना दरमहा पैसे दिले जातात. या योजनेत आतापर्यंत 11 वेळा हप्ते मिळाले आहेत. आता 12 वा हप्ता म्हणजे पुढचा पैसेचा टप्पा जमा होऊ लागला आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतोय की आपला हप्ता खात्यात आला का नाही? आणि आला असेल तर तो कसा पाहायचा?

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय की आता हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, आणि काहींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. म्हणून हप्ता आला आहे की नाही, हे बघण्यासाठी काही सोप्पे मार्ग आहेत.

तुम्ही तुमचा हप्ता कसा चेक करू शकता, ते पाहूया:

  1. कस्टमर केअरवर फोन करा:
    बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून खात्यात किती पैसे आहेत हे विचारू शकता.
  2. बँकेचं स्टेटमेंट पाहा:
    तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल, तर आधार वापरून बँकेचं स्टेटमेंट मिळवू शकता. हे काम बँकेत किंवा सेतू केंद्रात करता येईल.
  3. मिस कॉल द्या:
    काही बँका अशा आहेत की ज्या एका ठराविक नंबरवर मिस कॉल दिल्यावर तुमच्या खात्याची माहिती मेसेजद्वारे पाठवतात. यामध्ये हप्ता जमा झालाय की नाही हे समजतं.
  4. UIDAI पोर्टल वापरा:
    UIDAI या वेबसाइटवर जाऊन तुमचा आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाका. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती तिथं दिसेल. जर तिथं ‘लाडकी बहीण योजना’ असं नाव दिसलं, तर समजा हप्ता जमा झालाय.
  5. PhonePe किंवा Google Pay वापरा:
    ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे आणि PhonePe, Google Pay सारखे अ‍ॅप्स आहेत, ते आपल्या बँक खात्याचं बॅलन्स तिथून पाहू शकतात.
  6. थेट बँकेत जा:
    जर वरील कोणताही पर्याय वापरता आला नाही, तर थेट बँकेत जाऊन विचारू शकता की हप्ता जमा झालाय का.

तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, तुमचा 12 वा हप्ता जमा झाला की नाही हे घरबसल्या किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन सहज बघता येऊ शकतं. योजना सुरू आहे आणि पैसे जमा होत आहेत, त्यामुळे काळजी करू नका. वेळोवेळी तुमचं बँक खातं तपासत राहा.

Leave a Comment