महाराष्ट्र सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचा १२वा हप्ता ३० जून २०२५ पासून सुरू केला आहे. यामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. या हप्त्यात महिलांना ३००० रुपये आणि एक छोटी भेट मिळणार आहे.
मे महिन्याचा हप्ता आधीच जूनमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे सर्वांना वाटत होतं की जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळेल. पण योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे, सरकारने जूनच्याच महिन्यात हप्ता द्यायचं ठरवलं आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ३६९० कोटी रुपयांच्या हप्त्यासाठी मंजुरी दिली आहे. हे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात जमा होतील. पहिल्या टप्प्यात १ कोटी महिलांना पैसे मिळतील आणि उरलेल्या महिलांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळेल.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही नियम आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या महिलांनाच पैसे मिळतील. महिला महाराष्ट्रात राहत असावी, तिचं कुटुंब आयकरदाता नसावं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावं. त्यांच्याकडे चारचाकी गाडी नसावी आणि महिला सरकारी नोकरीत नसावी.
या योजनेच्या अंतर्गत, काही महिलांना ११ वा हप्ता DBT मध्ये तांत्रिक अडचणीमुळे मिळाला नव्हता. म्हणून अशा महिलांना १२ व्या हप्त्यात दोन्ही हप्ते एकत्र मिळून ३००० रुपये दिले जातील.
तुम्ही हप्ता मिळाला की नाही हे बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट काढून पाहू शकता. Google Pay, PhonePe किंवा नेट बँकिंगने देखील खात्यात बॅलन्स तपासता येतो. जर माहिती समजली नाही तर १८१ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून मदत घेता येते.
जर तुमच्याकडे अजून हप्ता जमा झाला नसेल, तर काळजी करू नका. तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळेल. आणि अजूनही मिळाला नाही, तर योजनेच्या वेबसाइटवर जाऊन ‘तक्रार अर्ज’ भरून आपली समस्या सांगू शकता.
महिला Narishakti Doot App किंवा सरकारी वेबसाइटवर जाऊन लॉगिन करून आपला अर्ज, त्याची स्थिती आणि हप्ता मिळाला की नाही, हे सहज पाहू शकतात. योजनेचा फायदा मिळवण्यासाठी अर्ज मंजूर असणे खूप महत्त्वाचे आहे.
अखेर, लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यामुळे सरकार आता महिलांना ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे, ज्याने त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि रोजगार मिळवू शकतील.