शेतकऱ्यांनो खुशखबर! पीएम किसानचा 20वा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही खूप वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी चालू आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना काही काळानंतर थोडे पैसे दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 वेळा पैसे दिले गेले आहेत.

आता सगळे शेतकरी 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कारण खरीप हंगाम सुरू झाला आहे आणि त्यासाठी पैशांची गरज आहे. काही माहितीनुसार लवकरच 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

सरकारने हप्ता पाठवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही मिळून पैसे पाठवण्याची प्रक्रिया करत आहेत. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील.

पण काही शेतकऱ्यांना शंका असते की त्यांना पैसे मिळणार की नाही. हे बघण्यासाठी तुम्ही योजनेचे ऑनलाइन स्टेटस चेक करू शकता.

स्टेटस चेक कसं करायचं ते खाली दिलं आहे –

  1. तुम्ही आधी https://pfms.nic.in या वेबसाईटवर जा.
  2. तिथे ‘DBT Status Tracker’ हा पर्याय शोधा आणि क्लिक करा.
  3. ‘PM KISAN’ हा पर्याय निवडा.
  4. नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. हा नंबर MH ने सुरू होतो.
  5. खाली दिलेला कोड (captcha) टाका आणि ‘Search’ वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचे सर्व तपशील दिसतील. म्हणजे आधी किती हप्ते मिळाले आणि पुढचा हप्ता कधी येईल हे कळेल.

हा 20वा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे –

  • ज्यांची आरएफटी मंजूर झाली आहे
  • ज्यांचा एफटीओ तयार झाला आहे
  • ज्यांनी योग्य कागदपत्र दिली आहेत
  • ज्यांनी केवायसी पूर्ण केली आहे

अशा सगळ्या पात्र शेतकऱ्यांना लवकरच हप्ता मिळणार आहे.

हा हप्ता कधी येणार?
जेव्हा सरकार एफटीओ तयार करते, त्यानंतर 2-3 दिवसातच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतत आपले स्टेटस चेक करत राहावे. हप्ता कधीही येऊ शकतो.

Leave a Comment