लाडकी बहीण योजनेचे ₹1500 जमा झालेत का? तुमचे खाते लगेच तपासा!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केलेली एक खूप उपयोगी योजना आहे. या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला सरकारकडून ₹1500 मिळतात. या योजनेचा फायदा विवाहित, विधवा आणि घटस्फोटीत महिलांना मिळतो. आतापर्यंत १२ वेळा म्हणजे १२ हप्ते पैसे दिले गेले आहेत.

आता जुलै महिन्यात १३ वा हप्ता मिळणार आहे. काही महिलांना १२ वा हप्ता मिळाला नव्हता. अशा महिलांना आता दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. म्हणजेच त्यांना ₹3000 रुपये बँक खात्यात मिळतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, ज्या महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना सरकार १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. त्यामुळे अशा महिलांना स्वतःचे काम सुरू करता येईल.

ही योजना फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी आहे. पण काही अटी आहेत. जसे की, घरातील वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. घरात कोणी सरकारी नोकरी करत असेल तर या योजनेचा फायदा मिळणार नाही. महिलेकडे ट्रॅक्टर किंवा चारचाकी गाडी नसावी. बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल नंबरशी जोडलेले असावे.

१३ व्या हप्त्याची नेमकी तारीख अजून जाहीर झालेली नाही. पण लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होतील. सरकारचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करणे हाच आहे. ही योजना खूप महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

Leave a Comment