PM Kisan Yojana: 20व्या हप्त्याचे पैसे या महिन्यातच येणार! तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का? तपासा आत्ताच

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत होती, पण आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे. आधी हा हप्ता जुलै महिन्यात येईल असं वाटत होतं, पण सरकारने सांगितलं आहे की हा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलं की, हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात वितरित केला जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतिक्षा होती. आता तारीख जाहीर झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खात्री मिळाली आहे की लवकरच ₹२००० त्यांच्या खात्यात येतील.

हप्त्याची माहिती कुठे तपासायची?
लवकरच pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर हप्त्याची माहिती अपडेट होईल. शेतकरी आपला आधार क्रमांक, बँक खाते किंवा मोबाईल नंबर टाकून Beneficiary Status तपासू शकतात.

महत्वाची अट
ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केलंय फक्त त्यांनाच हा हप्ता मिळेल. ज्यांचं eKYC झालेलं नाही त्यांनी ते लगेच पूर्ण करावं.

हप्ता उशीर का झाला?
सरकारच्या माहितीनुसार, तांत्रिक अडचणी आणि खात्यांची पडताळणी यामुळे उशीर झाला.

FAQ

  1. हप्ता कधी जमा होणार?
    २ ऑगस्ट २०२५
  2. कोण वितरित करणार?
    पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये कार्यक्रमात हप्ता देतील.
  3. हप्ता मिळण्यासाठी काय लागेल?
    eKYC पूर्ण असणं आणि खाते सक्रिय असणं.
  4. कशी तपासायची माहिती?
    pmkisan.gov.in वर आधार किंवा मोबाईल नंबर टाकून.

Leave a Comment